

वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण
पिंपरी : गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना मोशीतील संजय गांधीनगर येथे घडली.
या प्रकरणी गणेश लोंढे (रा. वडगाव घेनंद) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश तावडे (रा. मोशी) याला अटक केली आहे. फिर्यादीच्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपीला विचारत असताना आरोपीने ‘ही गाडी लावायची जागा आहे का?, तुला समजत नाही का? मी कोण आहे तुला माही नाही का?, असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. फिर्यादीच्या छातीत बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने रस्त्यावरील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरली
पिंपरी : दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोकड चोरली. ही घटना पिंपरी येथील मुख्य बाजार पेठेत घडली. या प्रकरणी महेश छाबा (रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन चोराने दुकानाचे शटर कशाच्या तरी साहाय्याने उचकटले. त्यानंतर काउंटरच्या ड्रॉवरमधील एकूण अकरा हजारांची रोकड चोरली.
घरात घुसून सोन्याचे दागिने चोरले
पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात जाऊन अज्ञात चोराने सोन्याचे दागिने चोरले. ही घटना जुनी सांगवी येथील सातपुडा हौसिंग सोसायटीत घडली. या प्रकरणी ३३ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोराने घरातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले.
बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरीतील नेहरूनगर येथे करण्यात आली.
दीपक भास्कर बर्फे (रा. रामनगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संत तुकारामनगर पोलिसांनी आरोपीला नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.