Bribery Case: लाचखोरी प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य अभियंता निलंबित

Pimpri Chinchwad Bribery Case : ठेकेदाराच्या निविदेच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
Pimpri Chinchwad Municipal Corporation chief engineer Pramod Ombhase suspended over a bribery allegation.

Pimpri Chinchwad Municipal Corporation chief engineer Pramod Ombhase suspended over a bribery allegation.

esakal

Updated on: 

पिंपरी : ठेकेदाराच्या निविदेच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना निलंबित केले. अटकेच्या दिवसापासून म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून निलंबन लागू झाले. याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्याचाही आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

Loading content, please wait...