नियोजन समिती नियुक्ती लांबली

नियोजन समिती
नियुक्ती लांबली
Published on

पिंपरी, ता. १९ ः पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा (डीपी) २०२५ मध्ये प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र, त्यावर सुमारे ५० हजार हरकती आल्या आहेत. त्यावरील सुनावणीसाठी नियोजन समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार स्थायी समितीतील तीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीत १६ पैकी ११ सदस्य आहेत. मात्र, त्यांच्यातून तीन सदस्यांची नावे निश्चित होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे डीपीसाठी नियोजन समितीतील नियुक्ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. दरम्यान, हरकतींवर सुनावणी घेऊन आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्याकरिता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com