पुढील दशक पर्यावरणपूरक शहराचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

फेस्टिव्हलविषयी

  • काय : पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर
  • कधी : शुक्रवार, ता. २८ व शनिवार, ता. २९
  • कुठे : ऑटो क्‍लस्टर, चिंचवड

पिंपरी - युवा उद्योजक व नव्याने उद्योग उभारणाऱ्या शहरातील युवकांना प्रोत्साहन देऊन पूरक वातावरण निर्माण करणे, कौशल्यवृद्धी करणे, नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखणे, पुढील दशकात पर्यावरणपूरक व राहण्यायोग्य शहर निर्माण करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर उपक्रमांतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नवउद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन व नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन असे उपक्रम असतील. त्यामध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अभय जेरे, विशाल गोंडल आदी नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा थोडक्‍यात परिचय. या उपक्रमाचे डीसीएफ व्हेंचर हे नॉलेज पार्टनर आहेत.

डॉ. रघुनाथ माशेलकर
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेचे मजी महासंचालक. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी, इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनअर्स, ग्लोबल रिसर्च अलायन्स या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम. ॲकॅडमी ऑफ सायटिंफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च संस्थेचे पहिले अध्यक्ष.

हे आहेत वक्ते...
विशाल गोंडल  

गोक्‍यूई संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. नुकतीच त्यांनी इंडियागेम या संस्थेची स्थापना केली. इंडियन इंटरप्रेनियरचे गुंतवणूकदार. 

डॉ. अभय जेरे 
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या संकल्पनेला चालना. उद्योजकतेविषयी मार्गदर्शन. अन्य देशांमधील नवीन संशोधनाचा अभ्यास. मनुष्यबळ विभागाचे मुख्य माहिती अधिकारी सध्या काम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad festival of the future event