
जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित विकास आराखड्यातील आरक्षण हे गरज नसताना प्रशासनाकडून टाकण्यात आलेले आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांना विचारात न घेता प्रशासनाकडून ही आरक्षणे टाकली असली तरी ती आम्ही होऊ देणार नाही.