

पिंपरी, ता. १३ ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मोटर वाहन निरीक्षकांनी अपघातग्रस्त बसची मंगळवारी (ता. १३) तपासणी केली. यावेळी बसचा विमा संकेतस्थळावर अद्ययावत नव्हता. चालकाकडे स्कूल बसचा बॅज नसल्याचेही उघड झाले आहे. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओने बसमालकाला १८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरुन चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी शालेय बसचा (एमएच ०२ बीक्यू १०८७) सोमवारी (ता. १२) दुपारी दीडच्या सुमारास तापकीर चौकाजवळ अपघात झाला होता. यामध्ये चालक आणि परिचालक जखमी झाले होते. आता अपघातग्रस्त बसची आरटीओने कसून चौकशी सुरू केली आहे. शालेय वाहतूक करणारे वाहन चालविण्यासाठी चालकाला वेगळा बॅज आवश्यक असतो. पण, अपघात झालेल्या बस चालकाकडे तो बॅजच नव्हता. तरी देखील शाळेने चालकाला ती बस चालविण्यासाठी दिली होती. त्या बसचा विमा जूनमध्येच संपला होता. त्यामुळे मोटर वाहन कायद्यातील नियमांचे सर्रास उल्लंघन करून बस विद्यार्थी वाहतूक करत होती.
आरटीओच्या पथकाने बस आणि चालकाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता चालकाकडे बॅज नव्हता. बसमालकाला मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
- राहूल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.