पिंपरी चिंचवड विद्यापीठाची प्रगती लक्षवेधी
वडगाव मावळ, ता. ४ : ‘‘तरुण असूनही स्पष्ट ध्येय आणि जागतिक उद्दिष्टे असलेले विद्यापीठ म्हणून पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्रगती लक्षवेधी आहे. गुणवत्तेच्या जोरावर हे विद्यापीठ वेगाने पुढे जात आहे,’’ असे गौरवोद्गार प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काढले.
मावळ तालुक्यातील साते येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी डॉ. भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमाळकर, विज्ञान व तंत्रज्ञान पार्क, पुणेचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विद्यापीठाच्या गव्हर्निंग बॉडीचे प्रतिनिधी डॉ. पंडित विद्यासागर, सचिन इटकर, राजेश पाटील, सलीम शिकलगार, अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आदी उपस्थित होते.
‘‘जागतिक शैक्षणिक विस्ताराच्या योजना, प्रस्तावित केंद्रीय संशोधन सुविधा, संशोधन केंद्र या उपक्रमांचा उल्लेख करत हे केंद्र विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रासाठी आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक समस्यांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचे सामायिक व्यासपीठ ठरेल,’’ असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला.
डॉ. करमळकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावीपणे अंमलात आणल्याबद्दल पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे अभिनंदन केले. विद्यापीठाची शैक्षणिक रचना सर्वांगीण शिक्षण, बहुविषयक अभ्यास आणि लवचिकता यांना प्रोत्साहन देते, असे त्यांनी नमूद केले.
कुलपती पाटील यांनी विद्यापीठाचे उद्योग-संलग्न विद्यापीठ म्हणून विकसित होण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. उद्योगासाठी तत्पर विद्यार्थी घडविण्याबरोबरच ज्ञान, संशोधन आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्याची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी विद्यापीठाच्या उद्योगसज्जतेवरील भराचे कौतुक केले. ‘‘विद्यापीठाने केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक घडविण्याच्या दिशेनेही पावले उचलावीत,’’ असे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘‘संस्थेचे उद्दिष्ट केवळ पदवीधर निर्माण करणे नसून, नैतिक मूल्यांवर आधारित, बौद्धिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि उद्योग-सज्ज व्यक्तिमत्त्व घडविणे हे आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

