

Water Security 2051
esakal
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह महानगर परिसराचे नागरीकरण व औद्योगिकीकरण वेगाने होत आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने पुढील २५ वर्षांची अर्थात २०५१ पर्यंतची पाण्याची संभाव्य मागणी, उपलब्ध जलस्रोत आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.