

Patient Reportedly Falls from Moving Ambulance at YCM Hospital
esakal
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा गलथानपणाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) धावत्या रुग्णवाहिकेतून चक्क एक बेवारस रुग्ण खाली पडल्याची धक्कादायक घटना रुग्णालय परिसरात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार काही सजग नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आहे.