उद्योगनगरीला हवे आता सहकार न्‍यायालयही

उद्योगनगरीला हवे आता सहकार न्‍यायालयही
Published on

पिंपरी, ता. २८ ः शहराच्या लोकसंख्यांसमवेत पोलिस ठाण्‍याची संख्‍या वाढत आहे. त्‍याच पटीत न्‍यायालयाची गरज देखील निर्माण झाली आहे. शहरासाठी नुकतेच मोटार विशेष न्‍यायालय सुरू झाले आहे. त्‍यानंतर आता सहकार व कामगार न्‍यायालय देखील सुरू करावे, अशी मागणी पुढे येत आहे. औद्योगिक नगरी म्‍हणून विचार केल्‍यानंतर या न्‍यायालयाची मागणी अधोरेखित होत आहे.
शहरात सहकारी न्‍यायालय संबंधित अनेक संस्‍था आहेत. या संस्थांशी संबंधित प्रकरणांसाठी नागरिकांना न्‍यायासाठी अथवा तक्रारीसाठी पुणे येथील सहकार न्‍यायालयात जावे लागते. त्‍यामुळे अनेक सभासद हे दावे दाखल करण्‍यासाठी टाळाटाळ करतात. विशेष म्‍हणजे पिंपरी चिंचवड शहरात सहकार न्‍यायालय संबंधित काम पाहणारे अगदी मोचकेच विधीज्ञ आहेत.


न्यायालय का आवश्‍यक
शहरात जवळपास सहा हजार ४५ सहकार संस्‍था नोंदणीकृत आहेत. शहरात या संबंधित पिंपरी, फुगेवाडी या दोन जिल्‍हा उपनिबंधक कार्यालय आहेत. शासनाच्‍या नव्‍या धोरणांमुळे नवे सहकारी संस्‍थांची नोंदणी होते, बँकांना परवाने देतात. त्‍यामुळे शहरात हे न्‍यायालय असणे गरजेचे आहे

कोणाला फायदा
पिंपरी चिंचवड शहराला याचा निश्चित फायदा होईल. तसेच, मुळशी, मावळ, जुन्‍नर, आंबेगाव, शिरुर, खेड यासह शहरातील नजीकच्‍या गावांना त्‍याचा फायदा होईल. या ठिकाणी देखील सहकारी संस्‍था काही हजारोंच्‍या घरात आहेत.

शहरात सहकार न्‍यायालय सुरू होणे गरजेेचे आहे. यासाठी मी स्‍वतः मुख्‍यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत सकारात्मक विचार करून स्‍वतंत्र सहकार न्‍यायालय स्‍थापन करावे.
- ॲड. गोरक्षनाथ झोळ, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com