

Traffic Police and Wardens Deployed Near Pimpri Dairy Farm Flyover to Stop Wrong-Side Driving
esakal
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून डेअरी फार्म उड्डाणपुलावर ये-जा करण्यासाठी काही वाहनचालक ‘नो-एंट्री’तून वाहने दामटतात. मात्र, पुलाचा तीव्र उतार आणि काटकोनातील वळण यामुळे अपघाताचा धोकाही आहे. याकडे लक्ष वेधून ‘सकाळ’ने बुधवारी (ता. १८) वस्तुस्थिती मांडली. त्याची दखल घेत महापालिकेने पोलिस प्रशासनाला पत्र पाठवून उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस व वॉर्डन नियुक्त केले आहे. त्यामुळे ‘नो-एंट्री’तून वाहने येणे बंद झाल्याचे चित्र गुरुवारी (ता. १९) सायंकाळी बघायला मिळाले.