

पिंपरी : म्हाडाचे फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमाकांत डाके, शुभम डाके आणि एक महिला (सर्व रा. साहिल रेसिडेन्सी, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला डांगे चौक येथील एका सोसायटीत म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून २० लाख ८५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना फ्लॅट दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
पिंपरी : दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोनजण जखमी झाले. ही घटना भोसरी उड्डाणपुलावर घडली. राहुल शंकर लगाडे (वय ३०, रा. खेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद बाळू गायकवाड (रा. वडगाव पाटोळ, ता. खेड, पुणे) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रसाद गायकवाड, त्यांचा मित्र दिनेश ओव्हाळ आणि राहुल लगाडे हे तिघेजण प्रसाद यांच्या दुचाकीवरून नाशिक फाटा, कासारवाडी येथे जात होते. राहुल हे दुचाकी चालवत होते. दरम्यान, ही दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांचा मित्र दिनेश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर राहुल यांचा मृत्यू झाला.
मारहाणप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : सोसायटीची सभा सुरू असताना जुन्या तक्रारीच्या कारणावरून एकावर शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना चऱ्होली येथे घडली. या प्रकरणी बाळासाहेब झोडगे (रा.चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश साने (रा. चऱ्होली) याला अटक केली आहे. फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीची विशेष सभा सुरू असताना या सोसायटीत राहणाऱ्या आरोपीने सोसायटीतील मागील तक्रारीच्या कारणावरून फिर्यादीला शस्त्राने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.