राजकीय दबावामुळे रखडला वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प

मिलिंद वैद्य
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मात्र, राजकीय दबावामुळे तो रखडला आहे. 

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मात्र, राजकीय दबावामुळे तो रखडला आहे. 

दबाव कशासाठी?
प्रकल्प रखडण्यामागे स्थानिक ‘बिल्डर लॉबी’ आणि बड्यानेत्यांचा राजकीय दबाव असल्याचे बोलले जाते. ११ फेब्रुवारी २०१६ ला होणाऱ्या भूमिपूजनाला पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर मे २०१६ मध्ये अचानक कामाला सुरवात झाली. चिंचवड भागात काही बड्या राजकीय व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या किमती प्राधिकरणाच्या किमतीच्या अनेक पटीने जास्त आहेत. ग्राहक त्याकडे वळला तर आपले काय?, या भीतीने दबाव आणला जात आहे.

प्रगती होईपर्यंत दंड
आतापर्यंत ॲलोफॉर्म तंत्रज्ञान संबंधित कंपनीकडे नव्हते. त्यामुळे काम रखडले होते. आता ॲलोफॉर्म तंत्रज्ञानामुळे प्रकल्पाला गती मिळाली आहे. जोपर्यंत समाधानकारक प्रगती होत नाही, तोपर्यंत कंपनीला दंड आकारणी सुरू राहील, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले.

अनुदान प्रतिसदनिका
१.५ लाख केंद्र सरकार
१ लाख राज्य सरकार
१९.८० कोटी एकूण (रुपयांत) 

सदनिकांचा प्रकार
वन बेडरूम किचन (१ बीएचके)
वन रूम किचन (१ आरके)

वस्तुस्थिती
दोन वर्षांत केवळ सात विंगचा पाया भरून कॉलम उभे
एका इमारतीचे दोन मजले पूर्ण, तिसऱ्याचे काम सुरू

दृष्टिक्षेपात प्रकल्प
कंत्राटदार -
एलोरा कन्स्ट्रक्‍शन, औरंगाबाद
एकूण सदनिका : ७९२
अपेक्षित खर्च : ७९.६९ कोटी 
कालावधी : ४२ महिने
सद्यःस्थिती : २० टक्के काम
कंपनीला दंड : दररोज १० हजार
एकूण जागा : ४.८५ हेक्‍टर
एकूण विंग्ज : ५५
एकूण इमारती : १३२
उद्देश : आर्थिक दुर्बल घटकांसाठी
प्रकल्प कुठे : पेठ ३० व ३२

प्रकल्प रेंगाळल्याने कंपनीला पूर्वी पाच हजार रुपये प्रतिदिन दंड केला जात होता. आता दहा हजार रुपये दंड आकारला आहे.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प उभारला जात आहे. त्याचे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण होईल.
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

Web Title: pimpri news valhekarwadi home project stop political pressure