पिंपरी रेल्वे स्टेशनचे पालटतेय रूप

पिंपरी रेल्वे स्टेशनचे पालटतेय रूप

पिंपरी - सातत्याने वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे शहरातील पिंपरी रेल्वे स्टेशनचा चेहरा बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 

अलीकडच्या काळात वाढलेल्या स्टेशनवरील प्रवाशांच्या संख्येचा विचार करून रेल्वेने दोन्ही प्लॅटफॉर्मवर ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सोयीसाठी (एस्कलेटर) सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले आहे. पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. जिन्याचा उपयोग प्रवाशांना फक्‍त फुटओव्हर ब्रिजवर जाण्यासाठी करता येईल. सरकता जिना दिवसभर प्रवाशांसाठी सुरू ठेवण्यात येणार असून, रात्री तो बंद राहणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूस नवीन पद्धतीने पीओपी रुफ बसविण्यात आले आहेत. स्टेशन परिसरातील जुने दिवे बदलण्यात असून, नवे एलइडी दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे स्टेशनच्या वीज बिलात बचत होत आहे. 

दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येत असून, पुढील महिन्यापर्यंत ती सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय प्लॅटफॉर्मवर ब्लॉक बसविण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. एका प्लॅटफॉर्मवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

पिंपरी स्टेशनवरील विकास कामे करण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही कामे करण्यात येत आहेत. पिंपरी स्टेशनवर सुरू असणारी कामे पुढील वर्षापर्यंत पूर्ण होतील. याखेरीज चिंचवड रेल्वे स्थानकावर सरकता जिना आणि फुटओव्हर ब्रिजची कामे करण्यात येणार आहेत. तळेगाव स्टेशनवर नवीन फुटओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहे.
- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

प्लॅटफॉर्मची वाढविण्याचे काम सुरू
पुण्याकडे जाणाऱ्या लोहमार्गाच्या बाजूला प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी असणाऱ्या नाल्यावर छोटा पूल बांधण्यात येणार असून, हा प्लॅटफॉर्म १२१ मीटरने वाढविण्यात येत आहे. पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर याठिकाणी १९ डब्यांची गाडी थांबू शकणार आहे. सध्या याठिकाणी १७ डब्यांची गाडी थांबू शकते. 

प्रवासी वाढले...
पिंपरी स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक दिवसाला याठिकाणाहून आठ हजार प्रवाशांची ये-जा होत असते. प्रत्येक वर्षी यामध्ये पाच ते दहा टक्‍यांची वाढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com