पिंपरी : पाच सुरक्षारक्षक ठेकेदार विना परवाना

‘खासगी सुरक्षा रक्षकांची ठेकेदारांकडून पिळवणूक’

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेच्या विविध आस्थापनेवर व मालमत्तेवर खाजगी सुरक्षा रक्षक ठेकेदारांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत महापालिका आस्थापनेत वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले आहेत. हे खाजगी सुरक्षा रक्षक ठेकेदार विना परवाना सुरक्षारक्षकांचा व्यवसाय करीत असल्याची तक्रार लोकजनशक्ती पार्टीचे प्रशांत खंडाळे यांनी पालिका आयुक्त व कामगार कल्याण मंडळाकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियम १९८१ च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड, कामगार विमा योजना, बोनस, पगारी रजा आदी फायदे सुरक्षारक्षकांना देत नाहीत व सुरक्षारक्षकांची पिळवणूक करून, त्यांना बारा-बारा तास राबवून अल्प पगार देऊन त्यांची फसवणूक करत आहेत. याची चौकशी करण्यात यावी, असे लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव प्रशांत खंडाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com