ऐवज लुटण्यासह जिवालाही धोका

ऐवज लुटण्यासह जिवालाही धोका
Published on: 

पिंपरी, ता. १७ : चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये चोरट्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्याही घटना घडत आहेत. पैसे, मोबाईल, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्याच्या उद्देशाने काही गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करतात. विरोध केल्यास किंवा प्रतिकार केल्यास मारहाण करण्यापासून ते धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यापर्यंत मजल जाते. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. अशा घटना मागील काही दिवसात शहरात घडल्या आहेत.

निर्जन रस्ते, कमी वर्दळीचे परिसर अशा ठिकाणी लुटमारीच्या घटना घडतात. काही घटनांमध्ये लुटमारीला विरोध करणाऱ्या नागरिकांना मारहाण करून जखमी केले जाते. त्यामुळे संबंधित नागरिकांवर हल्ला होण्याची भिती निर्माण होते. अचानक हल्ला झाल्यास नागरिकांना काय करावे, हे सुचत नाही. आपल्याकडील वस्तू वाचविण्याच्या प्रयत्नात काही जण चोरट्यांशी झटापट करतात. मात्र, समोरच्या व्यक्तीकडे हत्यार असल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशावेळी स्वतःचा जीव वाचविण्यास प्रधान देणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्यावी?
- रात्रीच्या वेळी शक्यतो वर्दळीच्या आणि प्रकाशव्यवस्था असलेल्या रस्त्यांचा वापर करावा
- एकट्याने प्रवास करताना कुटुंबीयांना प्रवासाची माहिती द्यावी
- मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे
- संशयास्पद व्यक्ती पाठलाग करत असल्याचे जाणवल्यास सुरक्षित, वर्दळीच्या ठिकाणी जावे
- स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे
- घटनेनंतर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर मदत मागावी


घटना
- २८ सप्टेंबर ः निघोजे- तळवडे पुलावर रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

४ ऑक्टोबर ः बंगळुरू-मुंबई महामार्गावर बाणेर येथे मोटार थांबवून उभ्या असलेल्या चालकाला तिघांनी मारहाण करून ऐवज लुटला

१३ ऑक्टोबर ः तळवडे येथे एका ज्येष्ठ महिलेचे हातपाय बांधून, मारहाण करीत घरातील ५७ लाखांचा ऐवज लुटला

जबरी चोरीच्या घटना
महिना ः घटना

जानेवारी ः ११
फेब्रुवारी ः १९
मार्च ः १२
एप्रिल ः १२
मे ः १९
जून ः १६
जुलै ः ११
ऑगस्ट ः १०
सप्टेंबर ः १३

शहरात ठिकठिकाणी सतत गस्त सुरू असते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाते. सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठीही विशेष पथक स्थापन केलेले आहे. गर्दीच्या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे. आपल्या परिसरात एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- सुदर्शन राठोड, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com