

पिंपरी, ता. ३ ः शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत १७ लाख २४ हजार ५३७ मतदार आहेत. मात्र, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात अंतिम यादीनुसार सहा लाख मतदार हे यादीच्या बाहेर गेले आहेत. त्यात अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत व दुबार मतदारांचा समावेश आहे.
चार लाख ५० हजार मतदार सापडू शकले नाहीत. तर ४४ हजार मतदार स्थलांतरीत झाले आहेत. मतदार पडताळणी मोहिमेत याद्यांतील अनेक नावे सापडू शकली नाहीत. वेगवेगळ्या कारणांमुळे ‘बीएलओ’ मतदारापर्यंत पोचता आले नाही. काही मतदारांनी स्थलांतर केले, तर काहींचा मृत्यू झाला आहे.
मतदारसंघनिहाय दुबार
- चिंचवड विधानसभा ः १४,१६४
- भोसरी विधानसभा ः १३,२३९
- पिंपरी विधानसभा ः ७,०००
- एकूण ः ३४,४०४
मतदारांची सद्यःस्थिती
विधानसभा मतदारसंघ / मतदार संख्या
पिंपरी / ४,०१,९७५
चिंचवड / ६,८७,०००
भोसरी / ६,३५,०००
तीस सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी
प्रारुप यादीत नाव असलेल्या मतदारांनी तसेच, अनमॅप्ड, ॲनोमलीज नोंद असलेल्या मतदारांनी आपल्या नोंदी तपासून दावे व हरकीत दाखल कराव्यात. ३० सप्टेंबरपर्यंत त्या दाखल करता येतील. नावातील दुरुस्तीसाठी नमुना आठ, हरकतींसाठी सात तर, नव्याने समावशेसाठी नमूना सहा वापर करावा, असे माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
न आढळलेले मतदार
मतदारसंघ / न आढळलेले / मयत / अनुपस्थित / स्थलांतरित / इतर / दुबार
चिंचवड / २,७०,०२३ / १७,१०७ / २,२०,४३९ / १८,१३० / १८३ /१४,१६४
पिंपरी / १,६५,७९५ / १८,८२७ / १,१२,७३८ / २६,७५५ / ४७४/१३,२३९
भोसरी / १,७३,२०७ / १४,४०२ / १,१७,११६ / २४,०६७ /४,३८३/७,००१
एकूण / ६,०९,०२५ / ५०,३३६ / ४,५०,२९३ / ६८,९५२ / ५,०४०/३४४०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.