मुठा खोऱ्याच्या विकासासाठी
नवीन चेहऱ्यांना संधी देणार

मुठा खोऱ्याच्या विकासासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देणार

Published on

पिरंगुट, ता. १ : ‘‘आमच्या मुठा खोऱ्यात विजेचे भारनियमन, अनियमित पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि बेरोजगारीने आम्ही त्रस्त आहोत. विकासापासून आजही आम्ही दूर असल्याने यावेळी आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. आबासाहेब शेळके आणि अनिल पवार या शिवसैनिकांच्या प्रभावी कार्यक्षमतेमुळे या दोन्हीही उमेदवारांना आम्ही विक्रमी मतांनी लीड देणार आहोत,’’ या भावना आहेत मुठा खोऱ्यातील शिवसैनिकांच्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आबासाहेब ऊर्फ माधवराव पांडुरंग शेळके व भूगाव पंचायत समितीचे उमेदवार अनिल पवार यांच्या वांजळे (ता. मुळशी) येथील प्रचार दौऱ्यात शिवसैनिकांनी भावनांना वाट करून दिली. यावेळी आबासाहेब शेळके म्हणाले, ‘‘अनिल पवारांसारखा दांडगा जनसंपर्कचा उमेदवार सेनेत आल्याने शिवसैनिक उमेदीने कामाला लागलेत. रस्ते, वीज, पाणी, शेती, महिलांसाठी लघुद्योग, बचत गटांना साहाय्य आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे. आमच्या आरोग्य शिबिराचा लाभ हजारो नागरिकांना झाला. शालेय विद्यार्थी, गरजू महिला, शेतकरी, आदिवासी बांधव यांना व्यक्तिगत पातळीवर केलेली मदत आमच्यासाठी दुवाच आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच अडचणी सोडवून विकास साधणार असल्याची खात्री मतदारांत झाली आहे.’’
यावेळी अनिल पवार म्हणाले, ‘‘धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी मुठा खोऱ्याची स्थिती आहे. इथले शेतकरी, महिला पाण्यासाठी त्रस्त आहेत. विजेची समस्येने लोक त्रस्त आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलोय. जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली असून, या खोऱ्यात मशाल पेटवण्याचा निर्धार पक्का झाला आहे. शिवसैनिक ईर्षेने कामाला लागले असून, विजय खेचून आणायचा त्यांचा संकल्प दृढ झाला आहे.’’
प्रचारादरम्यान वातुंडे, वांजळे, भोडे, माळेगाव, तसेच परिसरातील महिलांनी या दोन्हीही उमेदवारांचे उत्साही स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com