Pirangut Ghat police road cleaning incident
esakal
-पांडुरंग साठे
कोळवण (जि. पुणे) : पोलिस बांधवांच्या कर्तव्यतत्परतेचा परिचय नुकताच पिरंगुट घाटात आला. पिरंगुट घाटातील रस्त्यावर आरएमसी गाडीमधून मोठ्या प्रमाणावर सांडलेली माती व डस्ट (कच) लवळे फाटा ते पिरंगुट घाट परिसरात साचली (Road safety measures at Pirangut Ghat Pune) होती. या डस्टमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून मोठे अपघात होण्याची दाट शक्यता होती.