Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Pirangut Pune-Kolad Road Accident : पिरंगुटच्या लवळे फाट्यावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने डंपर, आयशरसह दोन दुचाकींना धडक दिली. अपघातात लक्ष्मण कुबल यांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले.
Pune Kolad Road Accident at Lavale Phata

Pune Kolad Road Accident at Lavale Phata

esakal

Updated on: 

पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे-कोलाड रस्त्यावर लवळे फाटा येथील श्रीपाद हॅाटेलसमोर आज सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या मालवाहू ट्रकने डंपर व आयशर या चारचाकी दोन वाहनांना, तसेच अन्य दोन दुचाकी वाहनांना ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघेजण जखमी झाले (Pirangut Pune-Kolad Road) आहेत. त्यांपैकी एकजण जागीच ठार झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तर एकजण किरकोळ जखमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com