भूगावकरांनी जपली रेवड्यांवरील कुस्त्यांची परंपरा
पिरंगुट, ता. ४ : भूगाव (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी गेल्या शंभर वर्षांची रेवड्यांवरील कुस्त्यांची परंपरा यावर्षीही जपली. धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून येथे उत्साहात कुस्त्यांचा आखाडा भरला. या आखाड्यातील कोणत्याही कुस्तीला इनाम अथवा किताब दिला जात नाही. कुस्ती झाल्यावर दोन्हीही मल्लांना रेवड्या देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीही ग्रामस्थांनी भरवलेल्या या आखाड्यात गावातीलच मल्लांनी सहभाग घेऊन प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. गावगाड्यांच्या चालीरीती, प्रथा, परंपरा, सणवार येथील अठरापगड समाज आजही उत्साहाने साजरा करत आहे.
होळी झाल्यानंतर होळीची राख आणि शेतातील बांधावरील गावठाणातील माती ओली करून धुळवड खेळण्याचा आनंद सर्व गावकऱ्यांनी घेतला. दुपारनंतर धुळवडीचा आखाडा इनामाच्या ओढ्याजवळ पार पडला. भूगावला कुस्तीची मोठी परंपरा असून नामांकित मल्ल या गावात होऊन गेलेले आहे. या गावाने यापूर्वी राज्यस्तरावरील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीचेही नियोजन केलेले होते. त्यामुळे येथील मल्लांना घरच्या मैदानात रेवड्यांवर कुस्ती करायची संधी म्हणजे एक मेजवानी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

