पितृपक्षात भाज्यांना मागणी; दर कडाडले

पितृपक्षात भाज्यांना मागणी; दर कडाडले
Published on: 

मोशी, ता. ४ : पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेतीमालाच्या उत्पादनावर झाला असून, बाजारातील आवकेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यातच सध्या पितृपक्ष सुरू असल्याने काही शेतीमालाची आवक तुलनेने कमी झाली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती, मोशी येथे फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांची आवक स्थिर आहे. मात्र, पितृपक्षामुळे लाल भोपळा, सुरण, भेंडी, गवार, दुधी भोपळा, तोंडली, काकडी, अळू यांसह कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्यांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे या भाज्यांच्या मागणीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने काही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

बाजारभाव पुढीलप्रमाणे
पालेभाज्यांची एकूण आवक ( ५१ हजार ८०० जुड्या)
कोथिंबीर : २१ हजार १०० जुड्या, मेथी : ४ हजार ५००, शेपू : ५ हजार २००, कांदापात : ३ हजार, पालक : ६ हजार ५००, चवळी : ५००, लाल माठ : ५००, पुदिना : २ हजार ५००

पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी रुपयात)
कोथिंबीर : १५ ते २०, मेथी : २० ते २२, शेपू : १२ ते १५, कांदापात : १५ ते २०, पालक : १२ ते १५, चवळई : ५ ते ७, पुदिना : ५ ते ७, लाल माठ : २० ते २५

फळभाज्यांची एकूण आवक : ५ हजार २५२ क्विंटल
कांदा : ५८५, बटाटा : १ हजार ६०६, लसूण : २०, आले : ३३, भेंडी : १२४, गवार : १४, टोमॅटो : १७७, मटार : ५४, घेवडा : ३२, दोडका : ३३, मिरची : १७६, दुधी भोपळा : १०८, भुईमूग शेंग : २८, काकडी : ३३२, कारली : २८, डांगर : ९६, गाजर : १६८, फ्लॉवर : ३४५, कोबी : ३५२, वांगी : १५२, ढोबळी : ९८, तोंडली : २६, बीट : ४, पावटा : ८, वाल : ११, शेवगा : २९, कैरी : ४, परवर : १४, चवळी : १०, रताळी : १०, घोसाळी : १६, कढीपत्ता : १६, लिंबू : ५९, मका कणीस : ७०, तूर : ६

फळभाज्यांचे दर (रुपयांत)
कांदा : ५० ते ६०, बटाटा : ३० ते ३५, लसूण : १३० ते १४०, आले : १०० ते १२०, भेंडी : ७० ते ८०, गवार : ७० ते ८०, टोमॅटो : २५ ते ३०, मटार : ९० ते १००, घेवडा : ७० ते ८०, दोडका : ४० ते ५०, मिरची : ८० ते १००, दुधी भोपळा : ४० ते ५०, भुईमूग शेंग : ७० ते ८०, काकडी : ४० ते ५०, कारली : ६० ते ७०, डांगर : ४० ते ५०, गाजर : ३० ते ४०, फ्लॉवर : ४० ते ५०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ४० ते ५०, ढोबळी : ५० ते ६०, सुरण : ४० ते ५०, जाड तोंडली : ४० ते ५०, बारीक तोंडली : ५० ते ६०, बीट : ४० ते ५०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ४० ते ५०, वाल : ३० ते ४०, शेवगा : ७० ते ८०, कैरी : ४० ते ५०, परवर : ६० ते ७०, चवळी : ३० ते ४०, घोसाळी : ५० ते ६०, कढीपत्ता : ३० ते ४०, लिंबू : ८० ते १२०, मका कणीस : ८० ते ९०, तूर : ४० ते ५०

फळांची एकूण आवक : ६०३ क्विंटल
सफरचंद : ५७, मोसंबी : ६६, संत्रा : १८, डाळिंब : १७, पेरू : १४, पपई : ९४, चिक्कू : ४, कलिंगड : १०, केळी : १०८, नारळ : १००, किवी : ३, पेर : ३, सीताफळ : ८, अननस : ३, ड्रॅगन : ८, आवळा : ३

फळांचे दर (रुपयांत)
सफरचंद : १२० ते २००, मोसंबी : १०० ते १२०, संत्रा : १०० ते १२०, डाळिंब : १८० ते २००, पेरू : १०० ते १२०, पपई : ५० ते ६०, चिक्कू : ९० ते १००, कलिंगड : ३० ते ४०, केळी : ४० ते ६०, खरबूज : ४० ते ५०, नारळ : ३५ ते ५०, किवी : ८० ते १००, पेर : ९० ते १००, सीताफळ : १०० ते ११०, अननस : ६० ते ८०, ड्रगन : ६० ते ७०, आवळा : ६० ते ७०
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com