फलटणच्या बाजारात उडदाला प्रतिक्विंटल ९५०० रुपयांचा दर गहू, मका, बाजरीची आवक; पिवळ्या मुगाला सर्वाधिक १६ हजार रुपयांचा दर

फलटणच्या बाजारात उडदाला प्रतिक्विंटल ९५०० रुपयांचा दर  गहू, मका, बाजरीची आवक; पिवळ्या मुगाला सर्वाधिक १६ हजार रुपयांचा दर
Published on: 

पिवळा मूगास क्विंटलला १६ हजार रुपये

फलटण बाजार समितीत भाव; ज्वारीची ४२ क्विंटल आवक

दुधेबावी, ता. ९ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत रविवारी (ता. ४) विविध शेतमालाची आवक झाली. बाजारात उडदाला प्रतिक्विंटल ७५०० ते ९५०० रुपये, तर हिरव्या मूगाला ७५०० ते १० हजार रुपये दर मिळाला. पिवळ्या मूगाने प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत मजल मारली.
बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची ३१४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २६०० ते २९४५ रुपये, मक्याची १९१ क्विंटल आवक होऊन २४५० ते २७०० रुपये, बाजरीची १७८ क्विंटल आवक होऊन २५०० ते ३००० रुपये दर मिळाला. ज्वारीला प्रतिक्विंटल ३४०० ते ६३०० रुपये, हरभऱ्याला ६००० ते ७४५० रुपये, खपली गव्हाला ४२०० रुपये आणि घेवड्याला ५५०० ते ९३०० रुपये दर मिळाला. ज्वारीची ४२ क्विंटल, हरभऱ्याची २६ क्विंटल, हिरव्या मुगाची २६ क्विंटल, उडदाची ३० क्विंटल आणि घेवड्याची २० क्विंटल आवक झाली.
शेतकऱ्यांनी बाजार समितीतील चालू बाजारभावांची माहिती घेऊन शेतमाल विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले.
.........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com