जगभरात होणार पुलंच्या स्मृतींचा जागर; वर्षभर रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’

‘आशय सांस्कृतिक’तर्फे ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारा ‘पुलोत्सव’ आता ‘ग्लोबल पुलोत्सव’ होणार आहे.
Global Pulotsav
Global PulotsavSakal
Summary

‘आशय सांस्कृतिक’तर्फे ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारा ‘पुलोत्सव’ आता ‘ग्लोबल पुलोत्सव’ होणार आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर जगभरात होणार आहे. ‘आशय सांस्कृतिक’तर्फे ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारा ‘पुलोत्सव’ आता ‘ग्लोबल पुलोत्सव’ होणार आहे. येत्या वर्षभर हा महोत्सव साजरा होणार असून याअंतर्गत देशातील तेवीस शहरांसह पाच खंडातील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रम रंगणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी ‘पुलं’च्या जन्मदिनानिमित्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. याप्रसंगी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सहसंयोजक सुवर्णा भांबुरकर आणि नयनीश देशपांडे उपस्थित होते.

‘८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘ग्लोबल पुलोत्सव’ जगभरात साजरा होणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर या शहरांसह देशातील इंदोर, बडोदा, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, अहमदाबाद आदी शहरांमध्ये महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच, जगभरातील लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरन्टो, जोहान्सबर्ग, सिडनी, ऑकलंड आदी शहरांमध्येही महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक शहरात मान्यवरांची ‘सल्लागार समिती’ तर पु. ल. प्रेमी आणि संस्थांची ‘कार्य समिती’ तयार करण्यात येणार आहे’’, अशी माहिती चित्राव यांनी दिली.

महोत्सवाची वैशिष्ट्ये -

- विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी

- सुमारे एक हजार कलाकार व साहित्यिकांचा सहभाग

- प्रत्येक शहरातील पुलोत्सवात ‘स्मृती सन्मान’, ‘जीवनगौरव सन्मान’, ‘कृतज्ञता सन्मान’ व ‘तरुणाई सन्मान’ होणार प्रदान

- महोत्सवाच्या निमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक आणि लघुपटाची निर्मिती

- महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पुलंच्या साहित्यावर ’धारलेल्या अर्कचित्रांचे प्रदर्शन

- ‘आय लव्ह पी. एल.’ या शीर्षकाखाली शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष मोहिम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com