Dr Babasaheb Museum & Memorial : पुणे परिसर दर्शन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि इतर दोन संग्रहालयांना भेट देऊ शकता.
Dr Babasaheb Ambedkar Museum and Memorial
Dr Babasaheb Ambedkar Museum and Memorialsakal
Summary

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि इतर दोन संग्रहालयांना भेट देऊ शकता.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि इतर दोन संग्रहालयांना भेट देऊ शकता. बालभारती खिंडीत आपल्याला एक निळ्या रंगाचा घुमट नजरेस पडतो. तिथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देणारे उत्तम संग्रहालय आहे. गेल्या गेल्या समोरच बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग मूर्ती रूपात जिवंत उभे केलेले आहेत. जसे की महाडचे चवदार तळे सत्याग्रह, भारतीय घटनेचा मसुदा सादर करणे, पुणे करार, काळाराम मंदिर सत्याग्रह, शपथविधी आणि धर्मांतर.

म्युझियमच्या आत असलेल्या पॅसेजमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचे फोटो आणि माहिती फलक. तिथून आत गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या वापरातल्या वस्तू म्हणजेच त्यांचे वापरायचे टेबल, आराम खुर्च्या, कपडे, घरातील भांडी दिसून येतात. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य आणि त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना यामुळे जिवंतपणे आपल्यासमोर येतात. या संग्रहालयाजवळच महात्मा फुले संग्रहालय आहे. हे इ.स. १८९० मध्ये पुना इंडस्ट्रियल म्युझियम नावाने सुरू केले होते. पुढे १९६८ मध्ये त्याचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे ठेवले. यात वेगवेगळे पाच सहा विभाग आहेत.

त्याचप्रमाणे कोथरूडमध्ये इ. स. १९९८ भाऊ जोशी यांच्या प्रयत्नातून चालू केलेले रेल्वे मॉडेल्स म्युझियम आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या आकारातल्या रेल्वेच्या मॉडेलच्या माध्यमातून रेल्वेचे काम कसे चालते ते दाखवले आहे. सिग्नल, सहा फलाट, गाडी साईडिंगला काढणे, घाटात गाडी जाणे इत्यादी रेल्वेच्या क्रिया कशा चालतात, त्या जिवंतपणे दाखवलेले आहे.

कसे जाल?

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय बालभारती खिंड येथे आहे. (वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५, तिकीट रुपये ५०)

  • महात्मा फुले संग्रहालय घोले रस्त्यावर बालगंधर्व चौकाजवळ आहे. (वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५, तिकीट रुपये १०)

  • जोशी रेल्वे संग्रहालय कोथरूडमध्ये करिष्मा सोसायटीजवळ आहे. (वेळ रोज सकाळी ९.३० ते ५, गुरुवारी सकाळी ९.३० ते १, तिकीट रुपये १२०)

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com