
अवघ्या सोळा वर्षांच्या शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघितलं. मावळातले काही साथीदार गोळा झाले अन् सगळे मिळून स्वराज्य स्थापनेच्या कार्यात गुंतले.
अवघ्या सोळा वर्षांच्या शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघितलं. मावळातले काही साथीदार गोळा झाले अन् सगळे मिळून स्वराज्य स्थापनेच्या कार्यात गुंतले. पण त्याआधी स्वराज्यात आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी रायरेश्वरच्या शिवालयात शपथ घेतली.
शिवरायांनी रोहिडेश्वरासमोर शपथ घेतली असा समज आहे, पण रोहिडा हा किल्ला असून त्यावर रोहिडमल्लाच मंदिर आहे. रायरेश्वर पठार प्रचंड मोठे आहे. पश्चिमेला नाखिंद या टोकाला जाण्यासाठी साधारण तीन तास चालत जावे लागते. याच्या अलीकडूनच अस्वल खिंडीमार्गे कोकणात उतरता येते. पावसाळ्यात पठाराचा परिसर सौंदर्याची खाणच असतो. पायथ्यापासून तासाभरात वर चालत जाता येते, तसेच बऱ्याच वरपर्यंत डांबरी रस्तासुद्धा आहे.
पठारावर चार ते पाच छोट्या वस्त्या आहेत. रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वर अशी तीन पठारे शेजारी शेजारी आहेत. रायरेश्वरला सगळ्या बाजूंनी मिळून सहा ते सात वाटा आहेत. रायरेश्वरला जाताना वाटेत अंबवडे येथे ओढ्याकाठी एक जुने आणि निसर्गरम्य जागी नागेश्वर मंदिर आहे. येथून जवळच शंकराची नारायण पंतसचिव यांची समाधी आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी एक झुलता पूल आहे. इ. स. १९३७ मध्ये हा पूल त्या वेळचे भोर संस्थानचे अधिपती रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला. रायरेश्वरवर मुक्कामाची आणि जेवणाची सोय होऊ शकते.
काय पहाल
रायरेश्वरावरील शिवालय हे महत्त्वाचे ठिकाण आहे. जाताना एक पाण्याचे टाक आहे, त्यात गोमुखातून पाणी पडते. याव्यतिरिक्त काही तलाव बघण्यासारखे आहेत. रायरेश्वराच्या आजूबाजूला सुंदर निसर्गरम्य कडे पसरलेले आहेत. तसेच अंबवडे येथील शिवालय आणि झुलता पूल पाहण्यासारखा आहे.
कसे पोहचाल
पुणे ते भोर एसटीने भोरला जावे. तेथून कोरले या पायथ्याच्या गावामध्ये एसटी किंवा जीपने जाता येते.
पुण्यापासून अंतर : ८० किमी
पायथ्याचे गाव : कोरले
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.