Vittalwadi and PL Deshpande Garden : पुणे परिसर दर्शन : विठ्ठलवाडी अन् पु. ल. देशपांडे उद्यान

एकेकाळी पुण्याबाहेरच्या महत्त्वाच्या जागांमध्ये असलेले विठ्ठलवाडीचे विठ्ठल मंदिर, आता अगदी गावात आले आहे.
Vittalwadi and PL Deshpande Garden
Vittalwadi and PL Deshpande Gardensakal
Updated on

एकेकाळी पुण्याबाहेरच्या महत्त्वाच्या जागांमध्ये असलेले विठ्ठलवाडीचे विठ्ठल मंदिर, आता अगदी गावात आले आहे. तरीही ते गावाबाहेर असताना आणि सिंहगड रस्ता लहान असताना तेथे गेलेले बरेच लोक आजही भेटतील. धावण्याचा सराव करण्यासाठी गावातून धावत जायचे उत्तम ठिकाण, सायकलवरून अर्धा दिवस सहलीला जाण्याचे ठिकाण, सिंहगडला जाताना हमखास थांबायचे ठिकाण अशा वेगवेगळ्या कारणांकरिता हे मंदिर प्रसिद्ध होते.

संभाजी गोसावी नावाचे विठ्ठल भक्त नेमाने पंढरीला जात होते, त्यांना शेतात नांगरणी करताना विठ्ठल मूर्ती सापडली आणि त्यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली होती अशी नोंद आहे. १७३२ पूर्वी कधीतरी या मंदिराचे बांधकाम झाले आहे. कारण त्यावर्षी निजामाने पुण्यावर स्वारी केली, त्यात या मंदिराचे बरेच नुकसान झाले होते.

त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून पेशवाई पद्धतीने त्याचे गढीवजा दगडी बांधकाम केले. मंदिरालगतच मुठा नदी वाहते. मंदिरात एक विहीर आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मोठ्या लांब लांब ओवऱ्या, भक्कम तटबंदी, दोन मोठे सभामंडप, मंदिराची भव्यता दर्शवितात. १८४२ मधील एका ताम्रपटानुसर मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबाकडे आहे. या कुटुंबाने पुढे मंदिरात दशावतार, महादेव मंदिर आणि हरिदास वेस बांधली. मंदिराच्या आवारात मारुती, गरुड, शनी अशा मूर्तीसुद्धा आहेत.

Vittalwadi and PL Deshpande Garden
Pune : कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार

पूर्वी असलेल्या वीटभट्टीच्या समोर म्हणजेच नावशामारुती मंदिराच्या चौकात एक लक्ष वेधून घेणारी बाग आहे. जपानच्या ओकायामा शहरात असलेल्या ३०० वर्षे जुन्या बागेच्या रूपरेशेवरून ही बाग तयार केली आहे. त्यामुळे याला पुणे ओकायामा मैत्री उद्यान किंवा पु. ल. देशपांडे उद्यान असे म्हणतात. सुंदर कारंजे, प्रसन्न हिरवळ, छोटीशी टेकडी आणि सगळीकडे हिरवाई यामुळे ही बाग पुणेकरांना आकर्षित करून घेते आहे. या बागेशेजारीच महापालिकेने मुघल गार्डनच्या धरतीवर एक बाग विकसित केली आहे. या दोन्हीही बागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे बसवलेले आहेत. उद्यानात पाच रु प्रवेश शुल्क आहे. वेळ सकाळी सहा ते साडेदहा आणि सायंकाळी चार ते साडेसात.

काय पहाल?

विठ्ठल मंदिर, त्याचे पेशवाई पद्धतीचे बांधकाम, आतील विविध मूर्ती, पु. ल. देशपांडे उद्यान.

कसे पोहचाल

पीएमपी बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com