‘पुष्पगुच्छांऐवजी रोपे देण्याची प्रथा सुरू करा’

‘पुष्पगुच्छांऐवजी रोपे देण्याची प्रथा सुरू करा’
Published on

सिंहगड रस्ता, ता. २८ : सार्वजनिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सत्कारासाठी दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छांऐवजी झाडांचे रोप देण्याची प्रथा सुरू करावी, अशी मागणी पद्मा फाउंडेशनने केली आहे. याबाबत फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांनी महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले.
या वेळी विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, उद्योजक निखिल तांबट आणि स्वामी समर्थ सेवा संस्थेचे काळूभाऊ चव्हाण उपस्थित होते. कांबळे म्हणाले की, ‘‘पुष्पगुच्छ प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले असतात आणि कार्यक्रम संपताच ते कचऱ्यात जातात. यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. रोपे दिल्यास पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल आणि ‘स्वच्छ, सुंदर व हरित पुणे’ संकल्पना यशस्वी होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com