प्लास्टिक वापराने वाढतोय कर्करोगाचा धोका
प्लॅस्टिक वापराने वाढतोय कर्करोगाचा धोका
डॉ. सुधीर कुंभार; मायणीत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
मायणी, ता. २५ : दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर वाढला असून, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. प्लॅस्टिकच्या वस्तूतील अन्नपदार्थ खाल्ल्याने अल्पवयात कॅन्सरचा धोका वाढत आहे. त्यासाठी प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मत दहिवडी येथील प्रा. डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान विभागाने आयोजित केलेल्या ‘प्लॅस्टिक कचरा शाश्वत व्यवस्थापन’ विषयावरील कार्यशाळेत ते बोलते होते. प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे अध्यक्षस्थानी होते.
शहरी भागांसह खेडोपाडीही आता प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या गंभीर होऊ लागल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. वन्यजीवांचेही अतोनात नुकसान होत असल्याचे स्पष्ट करून डॉ. कुंभार म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक सहजासहजी नष्ट होत नाही. त्यामुळे माती व जलप्रदूषण होते. त्यातील विषारी रसायने अन्नसाखळीत मिसळून कर्करोग, प्रजनन समस्या आणि श्वसनाचे विकार होतात. सागरी जीवनचक्र बाधित होत आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या व कंटेनरमधील विषारी रसायने अन्नात मिसळून शरीरात जातात. त्यामुळे कर्करोग, जन्मदोष आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी स्वतः हून प्लॅस्टिकचा वापर बंद करणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विभागणी व पुनर्वापर ही काळाची गरज आहे.’’
प्राचार्य डॉ. खुरपे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. प्रा. रोहिणी मगर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजया कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. श्रद्धा देशमुख यांनी आभार मानले. यावेळी प्रा. ममता दरेकर, प्रा. समिना शेख, प्रा. प्रियांका कांबळे आदी उपस्थित होते.
.........
चाैकट
..........
अनाेखे उद्घाटन
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून अनाेख्या पद्धतीने करण्यात आले.
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

