गादेगाव येथे प्लास्टिक कचर्याची होळी

गादेगाव येथे प्लास्टिक कचर्याची होळी

Published on

UPR26B07571
गादेगाव ः येथील शिवरत्न पब्लिक स्कूलच्या मैदानावर प्लास्टिक कचरा होळी साजरी करताना विद्यार्थी व शिक्षक.

शिवरत्न स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून कचऱ्याची होळी
पंढरपूर, ता. ४ : गादेगाव (ता‌.पंढरपूर) येथील शिवरत्न पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचऱ्याची होळी करून प्लास्टिकमुक्तीचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. सात वर्षांपासून येथील विद्यार्थी प्लास्टिक मुक्तीसाठी होळी साजरी करतात.
येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून प्लास्टिक कचरा गोळा केला. त्यानंतर दुपारी शाळेच्या मैदानावरच प्लास्टिक कचर्याची पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत प्लास्टिक वापर कमी करण्याचा संकल्पही केला. शाळेचे संस्थापक गणपत मोरे व शिक्षिका वर्षा मोरे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले.
प्लास्टिकपासून जमिनीचे व निसर्गाचे मोठे नुकसान होते.‌ पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक कमीत कमी वापर करावा.
घरामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये पडलेला सर्व प्लॅस्टिक कचरा विद्यार्थ्यांनी साफ करावा, असे आवाहन गणपत मोरे यांनी केले.
यावेळी संचालिका वर्षा मोरे, सहशिक्षिका शीतल बागल, लीना बागल, फर्जना पटेल, सुनीता राठोड, नियाज मुलाणी, वैभव माने, दीपक देशमुख, आविता कांबळे, तेजश्री गव्हाणे, तनुजा यादव, शाईन शेख, सायली सोनवले, मोनाली गायकवाड, प्रवीण यादव, महाळापा खांडेकर, अजय सावंत, सोनाली मागाडे, अजय मोरे, पूनम पाटोळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com