
पोलीस अंमलदार मुलाला काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरचा व्हिडिओ लॉकडाऊन कालावधीतील जून २०२०मधील आहे. संबंधित पोलिस आमलदार यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे.
कोरोना काळातील व्हिडिओ पुन्हा व्हायरल; पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
मंचर : “मंचर (ता.आंबेगाव) पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने अवैध व्यवसायिक व खंडणीखोर गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांने मारहान केलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल करत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल करताना सत्यता पडताळावी, अन्यथा चुकीचे मेसेज, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल केले जातील.”असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
''गेल्या तीन दिवसापासून सोशल मीडियावर मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावडेवाडी (ता.आंबेगाव जि.पुणे) येथे आई-वडिलांना शेतात डबा घेऊन निघालेल्या मुलाला राक्षसी वृत्तीच्या पोलिसांची अमानुषपणे मारहाण'' अशा मजकुराचा मेसेज व पोलीस अंमलदार मुलाला काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरचा व्हिडिओ लॉकडाऊन कालावधीतील जून २०२०मधील आहे. संबंधित पोलिस आमलदार यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे. सध्या मंचर पोलिसांनी अवैध व्यवसायिक व खंडणीखोर यांच्याविरुद्ध कारवाई सत्र सुरु केले आहे. त्यामुळे दुखावलेल्या अवैध व्यवसायिकाकडून जुनाच व्हिडिओ जाणून-बुजून पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी व्हायरल केला जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिसांबद्दल लोकांमध्ये गैरसमज व द्वेषाची भावना पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून सदर व्हिडिओ कोणी व्हायरल केला याबाबत चौकशी सुरु झाली आहे. संबंधितांचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.सदर जुना व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये.असे आवाहन कोरे यांनी केले आहे.
Web Title: Plot Tarnish Image Manchar Police Making Old Videos Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..