PM Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ; सहभागी होण्याची अंतिम तारीख जाहीर
Farmer Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना बिगर कर्जदारासाठी १४ ऑगस्ट आणि कर्जदारासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे : प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गावसाने यांनी दिली.