कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा|PM Modi Pune Visit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Pune Visit

कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर ((PM Modi Pune Visit)) होते. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाची (Maharashtra Corona Cases) वाढती रुग्णसंख्या पाहता मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) पुणे प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक, नारायण राणेंचा अजब तर्क

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार होते. पुणे मट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन; तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रम, या सर्व कार्यक्रमांना मोदी उपस्थिती दर्शवणार होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी देखील केली होती.

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अनेक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, मोदी नुकतेच पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं होतं. त्यांचा ताफा देखील उड्डाणपुलावर १५-२० मिनिटे अडकून पडला होता. सध्या या घटनेची चौकशी सुरू असून मोदींच्या सुरक्षेमध्ये कुठलीही चूक झाली नसल्याचं पंजाब सरकारने म्हटलं आहे.

Web Title: Pm Modi Pune Visit Cancelled Due To Maharashtra Corona Cases Increases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsNarendra Modi
go to top