PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

Suresh Kalmadi Chappal on pmपुण्यातील टिळक रोडवरील टिळक स्मारकाजवळ पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती.
suresh kalmadi chappal on pm
suresh kalmadi chappal on pmesakal

एकेकाळचे पुण्याच्या राजकारणातले खिलाडी मानल्या जाणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी त्यावेळच्या पंतप्रधानांवर पुण्यात चप्पल फेकून मारली होती. या घटनेनंतर चांगलाच गोंधळ झाला होता. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.

आणीबाणीनंतरच्या जनता सरकारचा तो काळ होता. सुरेश कलमाडींनी त्यावेळचे मंत्री शरद पवार यांच्या प्रोत्साहानामुळे राजकारणा उडी घेतली होती. पुढे ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. काँग्रेस सरकार पडल्याननंतर जनता सरकारमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान बनले होते. आणीबाणीच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीवरून जनता सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधींच्या विरोधात आघाडी काढली होती.

मोरारजी देसाईंनी बदल्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांचा रोष होता. एकदा मोरारजी देसाईंचा पुणे दौरा ठरला होता. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात देसाईंच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं. पंतप्रधान देसाई पुण्यात पोहोचले, त्यांचा दौरा टिळक रोडवरून जात असताना टिळक स्मारकाजवळ कलमाडींनी पंतप्रधान देसाईंवर चप्पल फेकून मारली अन् एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मोठ्या मोठ्या मथळ्याखाली बातम्या छापून आल्या वगैरे वगैरे...

सुरेश कलमाडी यांनी थेट पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याची बातमी थेट संजय गांधी यांच्यापर्यंत जाऊन पोहचली होती. प्रकरण वाढलं, याची चांगलीच चर्चा झाली पण सरकार पडल्यानंतर पक्षातील उतरत्या काळातही सुरेश कलमाडी यांनी केलेल्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठींकडून कौतुक झालं.

ही घटना त्यांच्यासाठी राजकारणातील करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट होता. पुढे त्यांना पक्षात बढती मिळाली पण शरद पवार ज्यावेळी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले त्यावेळी तेही पवारांसोबत बाहेर पडले होते. पण ते परत यु-टर्न मारून स्वगृही परतले आणि काँग्रेस पक्षात आपली नवी ओळख निर्माण केली. पुढे त्यांना मंत्रीपदही मिळालं.

पुण्याच्या राजकारणातील खिलाडी म्हणून ओळखले जाणारे कलमाडी पुढे कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यात अडकले आणि त्यांच्या राजकारणातील उतरता काळ सुरू झाला होता. त्यांना याप्रकरणी जेलची हवा खावी लागली, जेलमधून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरही बूट, चप्पल फेकण्यात आले पण पंतप्रधानांवर चप्पल फेकल्याच्या घटनेपासून त्यांच्या राजकारणातील चढावाला सुरूवात झाली होती हा इतिहास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com