PM Modi Pune Visit : PM मोदींचा पुणे दौरा कसा होता? काय घडल्या घडामोडी, वाचा सविस्तर

PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit

सरकार बदलल्याने कर्नाटकचं नुकसान झालं- मोदी

एकीकडे महाराष्ट्रात विकास होतोय तर दुसरीकडे शेजारचं राज्य कर्नाटकात काय होतंय ते समोर येत आहे. बंगळूरू मोठं आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होतं परंतु सरकार बदललं आणि जनतेचं नुकसान झालं.

२०१४ मध्ये फक्त ५ शहरात मेट्रो होती, आता...;PM मोदींची पुण्यात माहिती

आपल्याला भारतातील शहरात राहणाऱ्या लोकांचा जीवनस्तर उंचवायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टला अधुनिकतेची जोड दिलीच पाहिजे. देशातील शहरात मेट्रो सेवेचा विस्तार केला जात आहे. फ्लायओव्हर बांधले जात आहेत. २०१४ पर्यंत २५० किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. आता देशात हे नेटवर्क ८०० किमीहूनही जास्त झालं आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात मेट्रो सेवा होती आता देशात २० शहरात मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्ये देखील मेट्रो नेटवर्कचा विस्तार होत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा आहे.

पुण्यात पाच वर्षात तब्बल २४ किमी मेट्रो सुरू झाली - PM मोदी

पुण्यासारख्या आपल्या शहरात क्वालिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी आपलं सरकार सतत काम करत आहे. येथे येण्यापूर्वी पुण्याच्या आणखी एका सेक्शनचं लोकार्पण झालं आहे. पुणे मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली होती. या पाच वर्षात येते तब्बल २४ किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरू झालं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन संपन्न

पंतप्रधान मोदींनी आज पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं. यासोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारादरम्यान वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो सेवेचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे. तसेच यासोबत पंतप्रधान आवास योजनेचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

राज्याच्या विकासाला साथ देण्यासाठी आपण तिसरं इंजिन जोडलं - एकनाथ शिंदे

गेल्या वर्षभारामध्ये महायुती सरकारने केलेलं काम आपल्यासमोर आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारने केलेल्या मदतीने राज्य विकासाकडे जात आहे. हे खऱ्या अर्थाने डबल इंजिन सरकार आहे. त्यानंतर अजित पवार आले. अजित दादा म्हणाले मोदी साहेब या देशाला पुढे नेऊ शकतात आणि राज्याच्या विकासाला साथ देण्यासाठी आपण तिसरं इंजिन जोडलं. राज्यात आणि देशात समविचारी सरकार असतं तेव्हा आपण विकासकामांना चालना देऊ शकतो. - एकनाथ शिंदे

"मागच्या उद्घाटनावेळी तिघांचे रोल वेगळे होते, पण आता.." - फडणवीस

ज्या मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन केलं, अनावरण केलं, त्यांच्याच हस्ते दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील मोदींच्याच हस्ते होतं आहे. मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मीही होतो शिंदे साहेब आणि अजित दादा देखील होते. पण तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधीपक्षनेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. पण आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरिता, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुणे देशातील उत्तम शहर आहेच पण मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू, असे फडणवीस म्हणाले.

मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहीले याबद्दल त्यांचे आभार -  अजित पवार

पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राच्या राजधानीत स्वागत करतो, पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच साथ दिली आहे. मोदी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहीले याबद्दल मी त्यांचे आभार माणतो. पहिल्या टप्प्याचं उद्घाटन तेव्हा झालं आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देखील त्यांच्याच हातून होतं आहे - अजित पवार

 थोड्याच वेळात PM मोदी करणार पुणे मेट्रोचा विस्तार

लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात वनाझ ते रुबी हॉल, पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट या मेट्रो सेवेचा विस्तार करणार आहेत. अनेक विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

PM मोदींच भाषण संपताच जय श्रीरामचा जयघोष

पंतप्रधान मोदींच भाषण संपताच सभागृह जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणून गेलं.

टिळकांचा पुतळा पटेलांनी उभारला अन् त्याचं उद्घाटन गांधीजींनी केलं; PM मोदींनी सांगितला किस्सा

"सरदार पटेल अहमदाबाद महापालिकेचे प्रेसिडेंट बनले तेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये टिळक यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी व्हिक्टोरीया गर्डन ही जागा निवडली. इंग्रजांनी १८९७ मध्ये राणी व्हिक्टोरीयाचा हिरकमहोत्सव साजरा करण्यासाठी हे व्हिक्टोरीया गार्डन बनवलं होतं. ब्रिटश महाराणीच्या नावाने बनवलेल्या पार्कमध्ये त्यांच्या छातीवर सरदार पटेल यांनी क्रांतीकारी लोकमान्य टिळक यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला पण सरदार पटेलांनी सांगितले मी आपलं पद सोडेन पण मूर्ती तेथेच बसवली जाईल. १९२९ मध्ये त्या मुर्तीचं लोकार्पण महात्मा गांधींनी केलं." पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींची मराठीतून सुरूवात

लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमिला मी कोटी कोटी वंदन करतो अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरूवात केली.

"आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी जितका उत्साहीत आहे तितकाच भावूक देखील आहे. आज आपले सर्वांचे आदर्श बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील आहे. लोकमान्य टिळक हे स्वतंत्रता इतिहासातील कपाळावारील टिळक आहेत आहेत, सोबतच आण्णाभाऊंनी समाज सुधारणेसाठी दिलेलं योगदान असाधारण आहे. मी दोन्हीही महापुरुषांना नमन करतो. " असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मला पुण्याच्या पावन भूमीवर, महाराष्ट्राच्या धर्तीवर येण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असेही मोदी यावेळी म्हणाले.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींनी प्रदान

लोकमान्यांची पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानपत्र आणि केसरीचा पहिला अंक अशा स्वरूपात दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदान करण्यात आला.

देशातील पहिली सर्जिकल स्ट्राईक पुण्यात झाली - शरद पवार

"देशात अनेक राजे राजवाडे होऊन गेले, त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखलं जायचं. शिवछत्रपतींचं काम वेगळ्या दिशेने झालं. शिवछत्रपतींनी रयतेच स्वराज्य उभं करण्याचं काम पुणे शहरात केलं. तो पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केला होता. या सर्जिकल स्ट्राइकची चर्चा आज होते. पण लाल महलाचा ताबा घेण्याचा प्रयत्न शाहिस्तेखानानं केल तेव्हा या देशातील पहिली सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झाला हे आपण विसरू शकत नाही" - शरद पवार

मुख्यमंंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं तोंडभरून कौतुक, म्हणाले...

परदेशात देखील पंतप्रधान मोदींचं नाव सन्मानाने घतलं जातं. फ्रांन्स आणि अरब देशांनी पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती किती मान देतात हे आपण पाहिलं आहे. कोणी बॉस म्हणतं, कोणी स्वाक्षरी घेतं. कोणी त्यांची गळा भेट घेतं तर कोणी त्यांच्या पाया पडतं, अशावेळी आपण भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून PM मोदींचं अभिनंदन

"लोकमान्य टिळक हे प्रखर देशभक्त होते, ब्रिटीशांविरोधात लढताना त्यांच्या शब्दांना कमालीची धार येत असे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मोदींनी मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या वतीन मी त्यांचं अभिनंदन करतो" असे एकनाथ शिंदे म्हणाले

यंदाचा टिळक पुरस्कार मोदींनी का दिला?  दिपक टिळकांनी मांडली भूमिका

"आजवर ४० लोकांना हा पुरस्कार दिला गेला आहे. यावेळेस जेव्हा पुरस्कार देण्यासाठी चर्चेसाठी सगळे विश्वस्थ जमले तेव्हा आमच्यापुढे एकच नाव आलं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचं. या पुरस्काराकरता मोदी यांची निवड करण्यात आली कारण लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र्य, अधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले होते, राष्ट्रियत्व, हिंदुस्थानच्या पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, अधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी तंत्रज्ञान लोकमान्यांनी सांगितले होते आणि हे सुत्र नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्या राष्ट्रात आम्हाला दिसते" असे लोकमान्य टिळक पुरस्कार ट्रस्टचे दीपक टिळक म्हणाले.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात चौफेर लढा उभारला - दीपक टिळक

लोकमान्यांच्या व्यक्तीमत्वाला अनेक पैलू आहेत. लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरोधात चौफेर लढा दिला. तेव्हा अनेक नेते होते कोणी राजकारण कोणी अर्थिक सुधारणांवर बोललं. पण या सगळ्यांविरोधात एकत्रित लढा उभारण्याचं काम लोकमान्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या सगळ्यामुळे हा लढा चौफेर झाला.

PM मोदी कार्यक्रमस्थळी दाखल; पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरूवात

लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यास सुरूवात झाली असून या कार्यक्रमाच्या सुरूवातील पंतप्रधान मोदी यांना टिळकांनी लिहिलेल्या गितारहस्य पुस्तकाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुशिलकुमार शिंदे, रोहित टिळक इत्यादी नेते मंचावर उपस्थित आहेत.

पंतप्रधान मोदी एसीपी कॉलेजमध्ये दाखल, दुसरीकडे विरोधक आक्रमक

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी एसपी कॉलेज परिसरात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मोदींचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या मंडई परिसरात जमलेले विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना

दगडूशेठ मंदिरात पूजा आणि आरती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कर सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. आता अगदी थोड्याच वेळात एसपी कॉलेजच्या मैदानात या कर्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

PM मोदींनी दगडूशेठ मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान मोदींनी दगडूशेठ मंदिरात गणपती बाप्पातं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरात पूजा आणि आरती करण्यात आली. थोड्याच वेळात मोदी हे टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळाल. नागरिकांकडून गणपती बाप्पाचां जयघोष करत मोदी-मोदी अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत.

पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधान मोदी यांचं यावेळी स्वागत केलं. विमानतळावरून मोदी हेलिकॉप्टरमधून पुणे शहरातील सिंचन नगर येथील हेलिपॅडवर दाखल होतील.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपाल बैस मोदींच्या स्वागतासाठी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल बैस हे मोदींच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी यांचं पुण्यात आगमन होणार आहे.

नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पुण्यात दाखल होणार

पंतप्रधान मोदींच्या दोऱ्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे पुण्यात दाखल होणार आहेत. १०.४० मिनिटांनी त्यांचं हेलिकॉप्टर पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर ११ वाजता ते दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहेत.

पुण्यात सामाजिक संघटनाही मोदींविरोधात आक्रमक

पुण्यात सामाजिक संघटनाही मोदींविरोधात आक्रमक झाल्या आहेत. हातात पोस्टर घेऊन विविध संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

पुण्यात काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात आंदोलन!  पोलिसांनी विरोधकांना घेतलं ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काळे झेंडे घेऊन विरोधकांकडून पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन करण्यात येते आहे. यामध्ये काँग्रेससह अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बावगे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी काही विरोधकांना ताब्यात देखील घेतलं आहे. यावेळी पुण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

"देशाचे पंतप्रधान मणिपूरला जायला हवे होते, त्यांचं पुण्यात काय काम.." 

पीएम मोदींच्या दौऱ्यादरम्यान विरोधक आंदोलन करणार आहेत. यादरम्यान मणिपूरमध्ये जायला वेळ नसेल आणि तिथले निर्णय घ्यायला वेळ नसेल तर पुण्यातला कार्यक्रम म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येणे, मेकअप करणं आणि लोकांना खोटी आश्वासन देऊन निघून जाणं हा आहे. छोट्या-छोट्या कार्यक्रमाला मोदी येत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी आणि लोकांना थापा देण्यासाठी कार्यक्रम आहेत. त्यामुळे पुण्यात पंतप्रधान मोदी यांचा निषेध करणार आहोत, असे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत न करता निषेध व्यक्त करण्याबाबत विचारले असता धंगेकर म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जायले हवे होते, देशाच्या पंतप्रधानांचं पुण्यात काय काम आहे. तिथं माणसं मरत, जळत आहेत. महिलांना फरपटत नेऊन बलात्कार केले जात आहेत, ते त्यावर एक शब्दही बोलत नाहीत."

'असा' असेल मोदींची पुणे दौरा

सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुणे शहरात विशेष विमानाने आगमन होणार आहे. तेथून हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होईल.

त्यानंतर १०.४५ वाजता - श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर.

त्यानंतर ११.३५ वाजता - एस. पी. महाविद्यालयात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमास ते उपस्थिती लावतील.

दुपारी १२.३० वाजता -शिवाजीनगर पोलिस मुख्यालय मैदानावर मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद॒घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टीळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करतील. तसेच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे, पंतप्रधान आवास योजनांच्या हजारो घरांचे लोकार्पण होणार आहे. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या सर्व अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.