Baramati News : मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला प्रेरणास्थळाचे उद्घाटन

विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी नियोजित असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द झाला आहे.
PM narendra modi

PM narendra modi

esakal

Updated on: 

बारामती - विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी नियोजित असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द झाला आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या प्रेरणास्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वताः शरद पवार यांनी बारामतीत शुक्रवारी (ता. 20) या बाबत दिली. त्यामुळे मोदी आणि पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे.

Loading content, please wait...