
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. नायडू रुग्णालय मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) हे सर्वाधिक क्षमतेचे आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल, त्यामुळे या केंद्राचे काम गतीने करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी (ता. १७) दिली.