

Sudden Reinstatement: Suspended PMC Officials Back in Service
पुणे : पुणे महापालिकेने प्रशासकीय बदल्या करून आयुक्तांनी खांदेपालट केली आहे. दुसरीकडे पाषाण तलावातील हजारो माशांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित केलेल्या दोन अभियंत्यांसह आरोग्य निरीक्षकांचे निलंबन केले होते. तसेच सेवक वर्ग विभागात नियमांचे उल्लंघन केलेल्या अधीक्षकांचे निलंबन मागे घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांची विभागीय चौकशी रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेऊन केवळ बदल्या करण्यात आल्या आहेत.