

Pune flyover name
ESakal
पुणे, ता. ७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (ता. ८) होत असले तरी कार्यक्रमाच्या अधिकृत पत्रिकेत चौकाचे नाव चुकीचे नमूद झाल्याने लक्ष वेधले गेले आहे. या चौकाचे नाव आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक असे असताना पत्रिकेत मात्र पुणे विद्यापीठ चौक असा उल्लेख करण्यात आला आहे.