
पुणे : गंगाधाम चौकातील तीव्र उतारामुळे अपघात होऊन अनेकांचा प्राण जात असल्याने अखेर महापालिकेला जाग आली आहे. तेथील उतार कमी करण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा खर्च करण्याची मान्यता देण्यात आली. त्यासाठीची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी मंजूर करण्यात आली.