
पुणे : पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने खड्डे व रस्ते दुरुस्तीसाठी सुरुवात केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महापालिकेच्या डांबर प्लांटमधून गरम डांबर उपलब्ध होऊ लागल्याने शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम वेग धरू लागले आहे. याबरोबरच वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून खड्डे, रस्ते दुरुस्ती व पॅचवर्कची कामे केली जात आहेत. आत्तापर्यंत तीन हजार ३३१ खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत.