
पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून एअर कंडिशनर, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही असे लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले आहे. त्यामुळे आता २० लाख रुपयांच्या नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कडक सुरक्षा असलेल्या आयुक्त बंगल्यातून या वस्तू गेल्याच कशा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या प्रकरणावरून अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.