पुणे - पुण्यात शुक्रवारी (ता. १३) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर तुंबले, चौकाचैकात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडल्या, वाहतूक कोंडी झाली होती, असे असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काम सुरू करून १० ते २० मिनिटांत अनेक भागातील पाण्याचा निचरा करून रस्ते मोकळे केले, असा दावा प्रशासनाने केला आहे.