Vadgaon Health Crisis : वडगावातील कै. शांताबाई खडसरे दवाखान्यात पावसाळ्यात गळतीमुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, त्वरित उपाययोजना गरजेच्या आहेत.
पुणे : वडगावातील कै. शांताबाई खडसरे दवाखान्यात सध्या गळती सुरू आहे. बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणीच पत्र्याला गळती आहे. परिणामी परिसरात फरशादेखील निसरड्या होतात. मुसळधार पाऊस असल्यावर पत्र्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते.