पुणे - लक्ष्मी रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या वाड्यांना झोपडपट्टी सदृश दाखवून तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. त्यावरून आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे प्रकरण गंभीर असून, या प्रकरणात लक्ष घालून व्यवस्थित चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट सांगितले.