
पुणे : पुण्यातील महत्त्वाच्या ९८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यापैकी ६० पुलांचे आयुर्मान दहा वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना दुरुस्तीची गरज नाही. मात्र, ३८ पूल दहा वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत आठ पुलांचे काम पूर्ण झाले. उर्वरित ३० पुलांचे काम टप्प्याटप्प्याने केले जाईल. त्यामुळे कामाला गती द्या, असा आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.