
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात ‘जॅपनीज एन्सेफेलायटिस’ (जपानी मेंदूज्वर– जेई) ची प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून १ ते १५ मार्च दरम्यान १ लाख २३ हजार ४२७ हजार (१ ते १५ वर्षे वयोगट) मुला– मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही लस सुरक्षित असून पालकांनी मुलांना द्यावी असे आवाहन सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केले आहे.