esakal | पुण्यात कोरोना मृत्यूने ओलांडला 5000चा टप्पा; आज २७५२ नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

PMC Corona Death more than 5000 in Pune City 2752 new patients

आज दिवसभरात १ हजार ७६६ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील २२ रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात कोरोना मृत्यूने ओलांडला 5000चा टप्पा; आज २७५२ नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, आता तरी काळजी घ्या कारण, पुणे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने गुरुवारी (ता. १८) पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात आजपर्यंतचे सर्वाधिक ४ हजार ९६५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २ हजार २५२ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या आकडेवारीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात १ हजार ७६६ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील २२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमधील पाच, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन आणि नगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये आज नोंदली गेलेली एका दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी वाढ आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २९६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६६३, नगरपालिका क्षेत्रात १९७, आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५७ नवे रुग्ण आढळले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३० हजार १२९ सक्रिय (अक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी ८ हजार ७८४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत असून उर्वरित २१ हजार ३४५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image