
पुणे : ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक असताना त्याकडे व्यावसायिक मिळकतधारक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता महापालिकेकडून या मिळकतधारकांना नोटिसा बजावून नंतर दंडाची कारवाई केली जाणार आहे. मिश्र कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने दररोज २१ मिळकतींची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. शिवाय नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.