

Nomination Process Gains Momentum at Dhankawadi Ward Office
sakal
आंबेगाव/धनकवडी : महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी काही तासांची मुदत उरली असताना धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आज सोमवार (ता. २९) दुपारी तीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ३६,३७ आणि ३८ मधील साधारण ५९ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज उत्साहात दाखल केले. यावेळी इच्छुक उमेदवार आपले शक्तिप्रदर्शन करत कार्यालयात दाखल झाले होते.